Monday, June 28, 2010

अवखळ नदी...

हल्ली मला नवनवीन रचना सुचताहेत,
मग त्या मेंदीच्या असोत, नाहीतर शब्दांच्या...
सुंदर आकार प्रकार दोन्हीकडे दिसताहेत
दोन्हीकडची गुंफण अलगद उलगडत जाते आहे,
मी काय करू ...
माझ्या मनात अवखळ नदीच वाहते आहे,
नदीच्या दोन्ही काठांवर चैत्र पालवी फूलते आहे,
नवी कविता, नवी रचना स्फुरते आहे...

Tuesday, June 22, 2010

त्या तिमिरापशी...

ती आतंरिक ओढ़ माझ्या मनाची....
कशी सांगू तुला....,
त्या तिमिरापाशी....,
आहे एका किरणाशी जुळलेली मैत्री माझी...
दुरूनच बोलतो , हसतो आम्ही एकमेकांशी...
तो बोलावतो, "कधी येशील तू माझ्यापाशी?"
सांगते मी त्याला..."खुप कष्ट आहेत रे या मुळाशी॥
ते पर करून येईन बघ एक दिवस तुझ्यासाठी..."
दे फ़क्त विश्वास आत्म्याचा माझ्या
बघ कसे होइल, मग मनाप्रमाणे तुझ्या...
सांगू नकोस मला..... नाही ते एवढे सहज...
त्या शिवाय नाही जगणं एवढंच तू समज...

Saturday, June 19, 2010

स्वप्न ...

पावसात भिजायचं होतं मला ...
तुझ्यासोबत ... चिम्ब व्हायचं होतं ...
सारं सारं विसरून कुशीत शिरायचं होतं तुझ्या ...
मन मोकळं बोलायचं होतं ...
बरंच काही सांगायचं होतं...
वसंताच ऋतुपण पहायचं होतं ...
अनुभवायचं होतं...
ते मोकळं रान ...
.... ती सुखावणारी इन्द्रधनुष्यें …
ते मोहक मोतियांचे थेम्ब ...
अंगावर झेलून ... तुझ्यासोबत ...
धुंद-सा मातीचा सुवास ...
पण या सर्वांहून मोठी तुझी साथ .......
मिळेल का मला हे ...
सारं काही अनुभवायला .... की ...
जाशील सोडून ....
मला हवीय तुझी साथ....
खुप खुप स्वप्न पहिल्येत ...
तुझ्यासोबत पूर्ण करण्यासाठी ...
उद्याची केशरी पहाट पाहण्यासाठी ...

Friday, June 4, 2010

पहाटेचं दवं

मी अशी शांत , एकांत...
मी कधी गात एकांत...
कधी तरी येते हास्य-लकेर,
कधी येतो जिवंत झरा...
कधी उगीचच, कधी बळेचचं...
कधी नियम म्हणून,
तर कधी नातें जपायचे म्हणून...
कधी हळूचं फुलायचे... मनातल्या मनात...
तसचं हसायचं... गालातल्या गालात...
कधी हळूच डोळे मिटून ... स्वप्न पहायचं...
ते सत्यात उतरावं म्हणून...
देवाशी मनातल्या मनात भाण्डायचं ...
रुसायचं... , मग हसायचं... खळखळून ....
स्वतःवरच्याच वेडेपणाला....
- देवावर काय रुसयाचे? ? ?
उलट त्याच्या सोबत बोलायचे... हसायचे... खिदळायचे...
कधी एखाद्याच गार्हान सांगायच
कधी त्याला माफ़ कर म्हणून म्हनायच...
मग मन उगीचच उदास होत...
अश्यावेली काय कराव??
मग हळूच एक तान आठवते
त्या गोड्ड गल्यातली...
आपल्या गली उतरवावी वाटते...
एक गोड्ड आलाप गवासा वाटतो...
मग उदास टवटवीत होऊं जातं
मग त्याला आठवायचं ....
कधीही न भेटण्यासारखा हं...
आपला विरंगुळा...
मग आठवतं काम ....
कामाशिवाय आयुष्य नाही... त्याच्याशिवाय गति नाही...
मग अलगद सर्वे काही विसरतं
पहाटेचं दवं उन्हात विरून जातं ...
- नेत्रा

Tuesday, June 1, 2010

वसंत ऋतू

कोकिले चा पंचम, लगे मधुर कांचन,
आली वसंताची चाहुल,
सुमधुर बसुरीची धुन, हरपवितासे भान
दिसे नवखिच हिरावल, करी वायु हळूच कुंजन
दिसे नयनी बालकांची माला,
भासे जणू स्वर-सप्ताकांची हाला