Saturday, November 13, 2010

पहिला पाऊस


पहिल्या पावसातली ती पहिली भेट,
उत्सुकता शिगेला पोहोचलेली...

कसा असेल तो, कसा वागेल तो ...
फोन वर असंख्य बडबड करणारा हाच असेल तो?
हुः! वेडं मन काहीही विचार करतं...!
मनी हुरहुर, काहुर दाटलेली...
त्याच्यासोबत जाण्याची ती उत्सुकता शिगेला पोहोचलेली...
ती पावसातली आल्हाद दुपार ,
रिमझिम सरीत भिजणारे दोघं...
हातात हात घेउन मूंक संवाद साधणारे दोघं...
हळूच येणारी वार्याची झुळूक
तिच्या मोकळ्या केसांत गुंतून जाते...
तिचं सौंदर्य अधिकच खुलवून जाते....

भारलेल्या मनचा 'तो'...
तिला बराच कही सांगायचा असता...
हुः! पण शब्दच मिळत नाहीत...
आतुरलेली 'ती' सारं काही ऐकायला तयार असते ...
पण तो बोलतच नाही...
त्याच्या डोळ्यात पाहताना खरं तर सारं समजलेलं असतं...
पण तेच 'त्या'च्या शब्दत ऐकायचं असतं...
मनी हुरहुर, काहुर दाटलेली...
'त्या'चे शब्द ऐकायची ती उत्सुकता शिगेला पोहोचलेली....

Saturday, October 9, 2010

प्रेमात तुझ्या...

हलकेच वाटे तुझ्या कवेत, निजुन जावे सुरांसवे...
टिपुर चांदण्यात आठवांचे मोती जसे विरघळावेत....
तुझ्या प्रीतिची सर चकोरिला येणार नाही,
चंद्राची कोर जशी रोहिणीला विसरणार नाही...
गाण्यातली ती धुंद रात्र हलकेच आपल्यात उतरावी...
भिजून जावी ओल्या शब्दांत भावनांनी ओथंबावी...............!!!

Wednesday, August 11, 2010

सुगंध..

पाचुच्या बनी हिर्यांची रांगोळी,
कुणाचं नाव घेऊ त्या मोहोरत्या क्षणी ?
कुणी तरी असावं नाव घेण्यासारखं
कळी उमलावी जशी , तसं अलगद प्रवेशावं
मग त्या हिर्यांच्या रांगोळीत एक पोवाळं बसवावं
निखळ सौंदर्याचं लेणंच भासवं
हिर्याच्या रांगोळीला पाचूचा काठ
मणिकमोत्यांची दारी आरास, आरसी पुढं मोगर्याचा ताट
सुगंध मोगर्याचा दरवळे ताटी
ओंजळीत भरून माझ्या फुलेच फुले वाहती ...

Sunday, July 25, 2010

एक वाट..

धुक्यात हरवली एक वाट
वाटेवर होते एक गाव
गावात होते एक तळे
तळ्यात फूलती कमाळाची फूले
कमाळाच्या फुलावर करती भ्रमर भ्रमंती
मधु तेथे अर्थातच माश्या ही जमती
भ्रमर माश्यांची अशी कही मैत्री...
फूले ही फुलायचे विसरुनच जाती
फूलांसोबत वेलींवरती फळे देखिल लगडायची
शुक आणि पिकं तिथं आनंदात बागडायची
सारं काही छान असताना अचानक कुठे तरी माशीच शिंकली
आणि कशी काय कोण जाणे पण धुक्यात ती एक वाट हरवुनच गेली

Sunday, July 11, 2010

जाणीव...

अशीच बसले एक दिवस उदास
काहुर कसचं माजलं होतं मनात
रुंजी घालत होत्या भुतकाळातल्या आठवणी...
भविष्याची चाहुल लागली त्याच एक क्षणी...
सर्व काही विसरून मग जोमानं मन कामास लागलं,
भविष्यातली स्वप्नं वर्तमानात उतरवू लागलं ...
अचानक आलं मनात, काहीतरी आगळीक झाली ...
कुणी सांगावं , कुणीतरी मघाशी...
भुताकळावरच फुंकर घातली ...

Thursday, July 8, 2010

नवी पहाट...

नवीन समय नवीन साथ
विश्वासाने दिला तुजकडे माझा हात
देशील ना रे मला तुझी साथ...
स्वप्नात पहिन मी उद्याची पहाट
सत्यात आणू नवे काव्य-गात...
नवीन समय नवीन साथ
आले मी तुझ्याकडे नवे स्वप्न पहात
तुला आर्पिली मी माझी काया
घेउन चालु नवे मोह... नवी माया........ :-)

Monday, June 28, 2010

अवखळ नदी...

हल्ली मला नवनवीन रचना सुचताहेत,
मग त्या मेंदीच्या असोत, नाहीतर शब्दांच्या...
सुंदर आकार प्रकार दोन्हीकडे दिसताहेत
दोन्हीकडची गुंफण अलगद उलगडत जाते आहे,
मी काय करू ...
माझ्या मनात अवखळ नदीच वाहते आहे,
नदीच्या दोन्ही काठांवर चैत्र पालवी फूलते आहे,
नवी कविता, नवी रचना स्फुरते आहे...

Tuesday, June 22, 2010

त्या तिमिरापशी...

ती आतंरिक ओढ़ माझ्या मनाची....
कशी सांगू तुला....,
त्या तिमिरापाशी....,
आहे एका किरणाशी जुळलेली मैत्री माझी...
दुरूनच बोलतो , हसतो आम्ही एकमेकांशी...
तो बोलावतो, "कधी येशील तू माझ्यापाशी?"
सांगते मी त्याला..."खुप कष्ट आहेत रे या मुळाशी॥
ते पर करून येईन बघ एक दिवस तुझ्यासाठी..."
दे फ़क्त विश्वास आत्म्याचा माझ्या
बघ कसे होइल, मग मनाप्रमाणे तुझ्या...
सांगू नकोस मला..... नाही ते एवढे सहज...
त्या शिवाय नाही जगणं एवढंच तू समज...

Saturday, June 19, 2010

स्वप्न ...

पावसात भिजायचं होतं मला ...
तुझ्यासोबत ... चिम्ब व्हायचं होतं ...
सारं सारं विसरून कुशीत शिरायचं होतं तुझ्या ...
मन मोकळं बोलायचं होतं ...
बरंच काही सांगायचं होतं...
वसंताच ऋतुपण पहायचं होतं ...
अनुभवायचं होतं...
ते मोकळं रान ...
.... ती सुखावणारी इन्द्रधनुष्यें …
ते मोहक मोतियांचे थेम्ब ...
अंगावर झेलून ... तुझ्यासोबत ...
धुंद-सा मातीचा सुवास ...
पण या सर्वांहून मोठी तुझी साथ .......
मिळेल का मला हे ...
सारं काही अनुभवायला .... की ...
जाशील सोडून ....
मला हवीय तुझी साथ....
खुप खुप स्वप्न पहिल्येत ...
तुझ्यासोबत पूर्ण करण्यासाठी ...
उद्याची केशरी पहाट पाहण्यासाठी ...

Friday, June 4, 2010

पहाटेचं दवं

मी अशी शांत , एकांत...
मी कधी गात एकांत...
कधी तरी येते हास्य-लकेर,
कधी येतो जिवंत झरा...
कधी उगीचच, कधी बळेचचं...
कधी नियम म्हणून,
तर कधी नातें जपायचे म्हणून...
कधी हळूचं फुलायचे... मनातल्या मनात...
तसचं हसायचं... गालातल्या गालात...
कधी हळूच डोळे मिटून ... स्वप्न पहायचं...
ते सत्यात उतरावं म्हणून...
देवाशी मनातल्या मनात भाण्डायचं ...
रुसायचं... , मग हसायचं... खळखळून ....
स्वतःवरच्याच वेडेपणाला....
- देवावर काय रुसयाचे? ? ?
उलट त्याच्या सोबत बोलायचे... हसायचे... खिदळायचे...
कधी एखाद्याच गार्हान सांगायच
कधी त्याला माफ़ कर म्हणून म्हनायच...
मग मन उगीचच उदास होत...
अश्यावेली काय कराव??
मग हळूच एक तान आठवते
त्या गोड्ड गल्यातली...
आपल्या गली उतरवावी वाटते...
एक गोड्ड आलाप गवासा वाटतो...
मग उदास टवटवीत होऊं जातं
मग त्याला आठवायचं ....
कधीही न भेटण्यासारखा हं...
आपला विरंगुळा...
मग आठवतं काम ....
कामाशिवाय आयुष्य नाही... त्याच्याशिवाय गति नाही...
मग अलगद सर्वे काही विसरतं
पहाटेचं दवं उन्हात विरून जातं ...
- नेत्रा

Tuesday, June 1, 2010

वसंत ऋतू

कोकिले चा पंचम, लगे मधुर कांचन,
आली वसंताची चाहुल,
सुमधुर बसुरीची धुन, हरपवितासे भान
दिसे नवखिच हिरावल, करी वायु हळूच कुंजन
दिसे नयनी बालकांची माला,
भासे जणू स्वर-सप्ताकांची हाला

Monday, May 31, 2010

मलभ ...

नभात ते कोवाले उन्ह
मेघ सारे काले काले
मनात माझ्या कोवले उन्ह,
कृष्ण मेघ दूर झाले,
दिसे सर्व सृष्टि नवखिच उमलली
माझ्या मनातील मलभ
दूर सारुन गेली .....

Thursday, May 27, 2010

मैत्री

मैत्री असावी निर्मल,निर्भेल
पण नसावी मतलबी स्पर्धात्मक
मैत्री आसवी प्रमाणिक
प्रनाहूँ जपणारी
नसावी ती पैश्यासाठी - आसवी ती प्रेमासाठी
-------------------
:)

.. कणा ..

‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी,
बायको मात्र वाचली...
भिंत खचली, ... चूल विझली,... होते नव्हते नेले,...
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!!
- कवी कुसुमाग्रज