
पहिल्या पावसातली ती पहिली भेट,
उत्सुकता शिगेला पोहोचलेली...
कसा असेल तो, कसा वागेल तो ...
फोन वर असंख्य बडबड करणारा हाच असेल न तो?
हुः! वेडं मन काहीही विचार करतं...!
मनी हुरहुर, काहुर दाटलेली...
त्याच्यासोबत जाण्याची ती उत्सुकता शिगेला पोहोचलेली...
ती पावसातली आल्हाद दुपार ,
रिमझिम सरीत भिजणारे दोघं...
हातात हात घेउन मूंक संवाद साधणारे दोघं...
हळूच येणारी वार्याची झुळूक
तिच्या मोकळ्या केसांत गुंतून जाते...
तिचं सौंदर्य अधिकच खुलवून जाते....
भारलेल्या मनचा 'तो'...
तिला बराच कही सांगायचा असता...
हुः! पण शब्दच मिळत नाहीत...
आतुरलेली 'ती' सारं काही ऐकायला तयार असते ...
पण तो बोलतच नाही...
त्याच्या डोळ्यात पाहताना खरं तर सारं समजलेलं असतं...
पण तेच 'त्या'च्या शब्दत ऐकायचं असतं...मनी हुरहुर, काहुर दाटलेली...
'त्या'चे शब्द ऐकायची ती उत्सुकता शिगेला पोहोचलेली....

किती सुंदर आहे...............!!!
ReplyDelete