पावसात भिजायचं होतं मला ...तुझ्यासोबत ... चिम्ब व्हायचं होतं ...
सारं सारं विसरून कुशीत शिरायचं होतं तुझ्या ...
मन मोकळं बोलायचं होतं ...
बरंच काही सांगायचं होतं...
वसंताच ऋतुपण पहायचं होतं ...
अनुभवायचं होतं...
ते मोकळं रान ...
.... ती सुखावणारी इन्द्रधनुष्यें …
ते मोहक मोतियांचे थेम्ब ...
अंगावर झेलून ... तुझ्यासोबत ...
धुंद-सा मातीचा सुवास ...
पण या सर्वांहून मोठी तुझी साथ .......
मिळेल का मला हे ...
सारं काही अनुभवायला .... की ...
जाशील सोडून ....
मला हवीय तुझी साथ....
खुप खुप स्वप्न पहिल्येत ...
तुझ्यासोबत पूर्ण करण्यासाठी ...
उद्याची केशरी पहाट पाहण्यासाठी ...

mastt
ReplyDelete