Wednesday, August 11, 2010

सुगंध..

पाचुच्या बनी हिर्यांची रांगोळी,
कुणाचं नाव घेऊ त्या मोहोरत्या क्षणी ?
कुणी तरी असावं नाव घेण्यासारखं
कळी उमलावी जशी , तसं अलगद प्रवेशावं
मग त्या हिर्यांच्या रांगोळीत एक पोवाळं बसवावं
निखळ सौंदर्याचं लेणंच भासवं
हिर्याच्या रांगोळीला पाचूचा काठ
मणिकमोत्यांची दारी आरास, आरसी पुढं मोगर्याचा ताट
सुगंध मोगर्याचा दरवळे ताटी
ओंजळीत भरून माझ्या फुलेच फुले वाहती ...

Sunday, July 25, 2010

एक वाट..

धुक्यात हरवली एक वाट
वाटेवर होते एक गाव
गावात होते एक तळे
तळ्यात फूलती कमाळाची फूले
कमाळाच्या फुलावर करती भ्रमर भ्रमंती
मधु तेथे अर्थातच माश्या ही जमती
भ्रमर माश्यांची अशी कही मैत्री...
फूले ही फुलायचे विसरुनच जाती
फूलांसोबत वेलींवरती फळे देखिल लगडायची
शुक आणि पिकं तिथं आनंदात बागडायची
सारं काही छान असताना अचानक कुठे तरी माशीच शिंकली
आणि कशी काय कोण जाणे पण धुक्यात ती एक वाट हरवुनच गेली

Sunday, July 11, 2010

जाणीव...

अशीच बसले एक दिवस उदास
काहुर कसचं माजलं होतं मनात
रुंजी घालत होत्या भुतकाळातल्या आठवणी...
भविष्याची चाहुल लागली त्याच एक क्षणी...
सर्व काही विसरून मग जोमानं मन कामास लागलं,
भविष्यातली स्वप्नं वर्तमानात उतरवू लागलं ...
अचानक आलं मनात, काहीतरी आगळीक झाली ...
कुणी सांगावं , कुणीतरी मघाशी...
भुताकळावरच फुंकर घातली ...

Thursday, July 8, 2010

नवी पहाट...

नवीन समय नवीन साथ
विश्वासाने दिला तुजकडे माझा हात
देशील ना रे मला तुझी साथ...
स्वप्नात पहिन मी उद्याची पहाट
सत्यात आणू नवे काव्य-गात...
नवीन समय नवीन साथ
आले मी तुझ्याकडे नवे स्वप्न पहात
तुला आर्पिली मी माझी काया
घेउन चालु नवे मोह... नवी माया........ :-)

Monday, June 28, 2010

अवखळ नदी...

हल्ली मला नवनवीन रचना सुचताहेत,
मग त्या मेंदीच्या असोत, नाहीतर शब्दांच्या...
सुंदर आकार प्रकार दोन्हीकडे दिसताहेत
दोन्हीकडची गुंफण अलगद उलगडत जाते आहे,
मी काय करू ...
माझ्या मनात अवखळ नदीच वाहते आहे,
नदीच्या दोन्ही काठांवर चैत्र पालवी फूलते आहे,
नवी कविता, नवी रचना स्फुरते आहे...

Tuesday, June 22, 2010

त्या तिमिरापशी...

ती आतंरिक ओढ़ माझ्या मनाची....
कशी सांगू तुला....,
त्या तिमिरापाशी....,
आहे एका किरणाशी जुळलेली मैत्री माझी...
दुरूनच बोलतो , हसतो आम्ही एकमेकांशी...
तो बोलावतो, "कधी येशील तू माझ्यापाशी?"
सांगते मी त्याला..."खुप कष्ट आहेत रे या मुळाशी॥
ते पर करून येईन बघ एक दिवस तुझ्यासाठी..."
दे फ़क्त विश्वास आत्म्याचा माझ्या
बघ कसे होइल, मग मनाप्रमाणे तुझ्या...
सांगू नकोस मला..... नाही ते एवढे सहज...
त्या शिवाय नाही जगणं एवढंच तू समज...

Saturday, June 19, 2010

स्वप्न ...

पावसात भिजायचं होतं मला ...
तुझ्यासोबत ... चिम्ब व्हायचं होतं ...
सारं सारं विसरून कुशीत शिरायचं होतं तुझ्या ...
मन मोकळं बोलायचं होतं ...
बरंच काही सांगायचं होतं...
वसंताच ऋतुपण पहायचं होतं ...
अनुभवायचं होतं...
ते मोकळं रान ...
.... ती सुखावणारी इन्द्रधनुष्यें …
ते मोहक मोतियांचे थेम्ब ...
अंगावर झेलून ... तुझ्यासोबत ...
धुंद-सा मातीचा सुवास ...
पण या सर्वांहून मोठी तुझी साथ .......
मिळेल का मला हे ...
सारं काही अनुभवायला .... की ...
जाशील सोडून ....
मला हवीय तुझी साथ....
खुप खुप स्वप्न पहिल्येत ...
तुझ्यासोबत पूर्ण करण्यासाठी ...
उद्याची केशरी पहाट पाहण्यासाठी ...